काँग्रेसकडून भाजपच्या दोन मतांवर आक्षेप; निकाल लांबण्याची शक्यता

| Updated on: Jun 20, 2022 | 5:21 PM

आज पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा  निकाल (mlc election 2022 result)  लांबण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेस आक्षेप घेतला आहे. याबाबतचं आक्षेप घेणारं पत्र काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरला दिलं आहे.भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही आमदारांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केलं आणि मतपत्रिका बॅलेट पेपरमध्ये टाकली. […]

आज पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा  निकाल (mlc election 2022 result)  लांबण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेस आक्षेप घेतला आहे. याबाबतचं आक्षेप घेणारं पत्र काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरला दिलं आहे.भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही आमदारांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केलं आणि मतपत्रिका बॅलेट पेपरमध्ये टाकली. त्यामुळे त्यांचं मत बाद ठरविण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मत प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याने ही मतं रद्द करावी असा आक्षेप घेणारं पत्र काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरलाच दिलं आहे. याबाबत आता रिटर्निंग ऑफिसर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Published on: Jun 20, 2022 05:20 PM