MLC Election 2022: मिटकारींचा विधानपरिषद निवडणुकीवरून गौप्यस्फोट ! काय म्हणाले मिटकरी?
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (MLC Election 2022) महाविकास आघाडीच्या तीनही पक्ष श्रेष्ठींनी आमदारांशी संवाद साधला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाची भूमीका घेतली असल्याचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले. कामं न झाल्यामुळे आमदारांच्या मनात नाराजी होती मात्र आता पक्षात सर्व काही ठीक असल्याचे मत मिटकरी यांनी मांडले. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करू […]
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (MLC Election 2022) महाविकास आघाडीच्या तीनही पक्ष श्रेष्ठींनी आमदारांशी संवाद साधला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाची भूमीका घेतली असल्याचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले. कामं न झाल्यामुळे आमदारांच्या मनात नाराजी होती मात्र आता पक्षात सर्व काही ठीक असल्याचे मत मिटकरी यांनी मांडले. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सभेमध्ये जी चूक झाली ती आता विधानपरिषदेमध्ये होऊ नये याची सर्व खबरदारी महाविकास आघाडीकडून घेण्यात असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेचा पक्ष स्थापना दिवस असल्याने ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झालेली आहे.
Published on: Jun 19, 2022 02:34 PM
Latest Videos