Raj Thackeray | सगळी मदत करु, काळजी करु नका – राज ठाकरेंचा फोनवरुन शिक्षिका सुमन रणदिवे दिलासा
चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेला, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली.
Latest Videos