… तर तुम्ही कुठलेही नागरिक राहणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा काय?
स्थानिक माणूस उध्वस्थ होत आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली तर तुमच्याकडे हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक राहणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे, तर तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे, याचा तुम्हाला अंदाज आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी मराठी नागरिकांना विचारला.
रायगड, १५ जानेवारी २०२४ : महाराष्ट्र राज्यात फक्त मराठा लोकांनी राज्य केलं आणि आत्ता तुमच्याच जमीन दुसरे येऊन घेत आहेत. हे काय फक्त रायगडमधे होत नाही तर इतर जिल्ह्यात सुद्धा होत आहे. स्थानिक माणूस उध्वस्थ होत आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली तर तुमच्याकडे हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक राहणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला तर तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे, याचा तुम्हाला अंदाज आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी मराठी नागरिकांना विचारला. महाराष्ट्रात जे-जे उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न सर्व बाजूने होतोय. थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं गांभीर्य स्थानिक लोकांना असलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
Published on: Jan 15, 2024 02:04 PM