‘अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो…’, एन्काऊंटर बोलताना शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Sep 25, 2024 | 2:55 PM

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची त्यांनी आज भेट घेतली.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने किंवा राज ठाकरेची बायको म्हणून बोलत नाहीय. मी आज इथे महिला म्हणून बोलत आहे. मला स्वत:ला मुलगी आहे. मी महिलांच्या बाजूने, त्यांची एक प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. आमच्यात इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. आम्ही दररोज जे पेपरमध्ये वाचतो, महिलांविरोधात हिंस्त्र गुन्हे घडतात. बलात्कार केल्यानंतर वाईट पद्धतीने खून होतो. इतर राजकारणी काय बोलतात, विरोधी पक्ष काय बोलतात, कोर्ट काय बोलतं? याचं मला काही पडलेलं नाही. महिला म्हणून मला अभिमान वाटला. त्या पोलिसांच कौतुक केलं पाहिजे. महिलांमध्ये अशी सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी असे एन्काऊंटर झाले पाहिजेत’, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. पुढे च्या असंही म्हणाल्या, तुम्ही शक्ती कायद्याबद्दल बोलता, असा शक्ती कायदा आम्हाला अभिप्रेत आहे. आम्हाला महिलांना असा शक्ती कायदा हवा” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. अक्षय शिंदे कोणी संत नव्हता असं म्हणत त्या भडकल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Sep 25, 2024 02:55 PM
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग आठ दिवस उपोषण केल्यानंतर नवव्या दिवशी माघार?
‘बाजारबुणगे, हिंमत असेल तर येऊन बघ…’, उद्धव ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?