'अकेले ही काफी है', होऊ द्या चर्चा, राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच, कुणी केला दावा?

‘अकेले ही काफी है’, होऊ द्या चर्चा, राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच, कुणी केला दावा?

| Updated on: Oct 18, 2023 | 8:42 PM

नाशिकमध्ये काय झालं होतं याची प्रचिती सर्वांना आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे. म्हणून मी सांगितलं की साहेबांना मुख्यमंत्री बनवूया. माझ्या लोकसभेविषयी चर्चा होतेय. ती होऊ द्या, चर्चा तो होनी चाहिये. आम्ही लढवैये आहोत. पक्षाने जवाबदारी दिली तर लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई | 18 ऑक्टोंबर 2023 : पक्षाने आम्हाला जबाबदारी दिली आहे. त्यासंदर्भात आम्ही काम करत आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरु आहे. पक्षात नवीन लोकांना संधी दिली जाते. मात्र, आम्ही लढवय्ये आहोत. पक्षाने जर जवाबदारी दिली तर लोकसभा लढणार असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. कोणतीही निवडणूक असो ती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सिनेट, पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश साहेबांनी दिले आहेत. निवडणुकामध्ये जय पराजय होत असतो. पण, आता इथून पुढच्या सर्व निवडणुका विजयासाठी लढणार आहोत. ‘मानो या ना मानो, हम अकेले है, अकेले काफी है.’ राज साहेब यांच्यामध्ये मुख्यमंत्री बनण्याची काबिलत आहे आणि आम्ही त्यांना मुख्यमंत्री करणारच असेही ते म्हणाले.

Published on: Oct 18, 2023 08:42 PM