‘ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री बदला, नसेल जमत तर…’, मनसेच्या राजू पाटील यांनी का केली मागणी?

| Updated on: Aug 24, 2023 | 11:54 PM

VIDEO | मनसे नेते राजू पाटील यांची ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका, 'नसेल जमत तर पालकमंत्री बदला एक तर डीपीडीसी व्हायला पाहिजे आणि सातत्याने त्यांचा वावर असायला पाहिजे'

Follow us on

ठाणे, २४ ऑगस्ट २०२३ | ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी कल्याण डोंबिवली चा कुठलाही दौरा केला नसल्याने आमदार राजू पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करत माझा पालकमंत्र्यांशी वैयक्तिक असा काही वाद नाही. ना काही नाराजी मंत्री म्हणून. परंतु ते सातारा राहतात आणि इकडे यायला त्यांना काही अडचण होत असेल. दोन – तीन वेळा डीपीडीसी पुढे जात असेल. जिथे आमचे महत्वाचे प्रश्न पेंडिंग राहतात. पालिका जिल्हा परिषद यांच्याशी संबंधित प्रश्न असतात, त्या प्रश्नाचा आढावा घेतल्यानंतर, ते बैठकीत आम्ही मांडल्यानंतर त्याच्यावर कारवाई काय होते यासाठी पालकमंत्री आम्हाला भेटतच नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की पालकमंत्री इथे जवळचे कोणीतरी द्या. कारण त्यांना एवढे लांबून जमत नाही आहे .कायदा सुव्यवस्था पाहिला तर कल्याण कोळशेवाडी मध्ये काय घटना घडल्यात. मानपाडा मध्ये रोजच्या चोऱ्या होतात. मानपाडा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाही आहेत राजकारणपायी. अशा काही गोष्टी असतील, कायदा सुव्यवस्था, वाहन कोंडी, पाण्याच्या समस्या आहेत त्या मांडायच्या कुठे. पालकमंत्री मोठे माध्यम असते की त्याच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न मांडू शकतो. आणि त्यांना इकडे यायला जमत नसेल त्या भावनेतून मी बोललो की, नसेल जमत तर पालकमंत्री बदला एक तर डीपीडीसी व्हायला पाहिजे आणि सातत्याने त्यांचा वावर असायला पाहिजे या हेतूने मी बोललो असे सांगत पालकमंत्री बदलण्याच्या मागणी राजू पाटील यांनी केली आहे.