‘माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन नाही मी फिरत..,’ काय म्हणाले राज ठाकरे
भाजपाने ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व एकतर भाजपात आहेत किंवा सरकारमध्ये मंत्री आहेत.त्यावेळी त्यांच्यावर भूमिका बदलली म्हणून टीका झाली नाही, पण माझ्यावर मात्र भूमिका बदलल्याचा सारख्या आरोप होत असतो असे राज ठाकरे यांवेळी म्हणाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी येथे मनसेच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. यावेळी राज ठाकरे यांच्यावर भूमिका बदलल्याचा आरोप केला जातो. यावर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत कोरडे ओढले. राज ठाकरे यांनी कोहिनुर टॉवरच्या विकासातून आम्ही का बाहेर पडलो याचे कारण सांगितले. आम्हाला जेव्हा वाटले तेव्हा आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडलो. परंतू आम्ही आमचा स्टेक विकून बाहेर पडलो. त्याचा टॅक्स आम्ही भरला होता. परंतू मला ईडीची नोटीस आली, ही नोटीस नेमकी कसली होती हेच कळले नाही. नंतर आमच्या सीएला विचारले तेव्हा त्याने सांगितले की आमच्या एका भागीदारने आम्ही दिलेला टॅक्स भरलाच नव्हता, स्वत:च वापरला. त्यानंतर आम्ही पुन्हा टॅक्स भरला. राज ठाकरे ईडीच्या नोटिसीला घाबरले असा प्रचार केला गेला. पण आपण २०१४ मध्ये आणि २०१७ मध्ये मला जे बोलायचे होते ते बोललो होतो. मला जे चांगले वाटले त्याचे कौतूक केले जे चुकीचे वाटले त्यावर टीका केली असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन नाही मी फिरत, सहा दिवस आधी मोदी म्हणतात की ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आतमध्ये टाकू, आम्हाला माहिती नव्हते मंत्रीमंडळात टाकणार आहेत. ते आतमध्ये टाकू याचा अर्थ मंत्रीमंडळात टाकू आहे हे पहिल्यांदा मला कळले असाही टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा

शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट

पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का

'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
