Video: राज ठाकरेंचा आणखी एक नवा लूक चर्चेत, तुम्ही पाहिला का?

| Updated on: Aug 12, 2021 | 2:48 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आणखी एक नव्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मनसेच्या सरचिटणीस आणि राज ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय रिटा गुप्ता यांचे चिरंजीव हर्ष गुप्ता यांचं बुधवारी लग्न  झाला. मुंबईतील ‘द लीला’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आणखी एक नव्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मनसेच्या सरचिटणीस आणि राज ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय रिटा गुप्ता यांचे चिरंजीव हर्ष गुप्ता यांचं बुधवारी लग्न  झाला. मुंबईतील ‘द लीला’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी राज ठाकरे यांचा नवा लूक दिसून आला. राज ठाकरे यांनी नेहमीचा कुर्ता पायजमा घातला आहे. मात्र यावेळी पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजम्यावर त्यांनी शाल घेतली आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे अनेकदा अशा वेशभूषेत दिसले होते. काहीसा तसाच पेहराव राज ठाकरे यांनी परिधान केला आहे. शिवाय डोळ्याला गॉगल आणि पायात मोजडी असा राज ठाकरेंचा लूक लक्ष वेधत आहे.

Sangli | जिवंत नागपूजा रोखण्यासाठी बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीवर वनविभागाकडून यंदा ‘ड्रोन’ची नजर
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 12 August 2021