राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, मी नाराज नाही, नाराज असण्याचा प्रश्नच नाही : साईनाथ बाबर
राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. मी नाराज नाही, नाराज असण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया साईनाथ बाबर यांनी टीव्ही 9 मराठीकडे दिली आहे. साईनाथ बाबर नाराज असल्याची शहरभर चर्चा होती. या चर्चेचं साईनाथ बाबर यांच्याकडून खंडन करण्यात आलं असून मी पक्षावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील भूमिकेमुळं पुण्यातील मनसेचे नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पुण्यातील मनसेचे नगरसवेक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर (Sainath Babar) नाराज असल्याच्या बातम्या काल प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र त्यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आज मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. नाराज असण्याचा प्रश्न नाही, असं त्यांनी म्हटलंय. मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी नाराजीच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. मी नाराज नाही, नाराज असण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया साईनाथ बाबर यांनी टीव्ही 9 मराठीकडे दिली आहे. साईनाथ बाबर नाराज असल्याची शहरभर चर्चा होती. या चर्चेचं साईनाथ बाबर यांच्याकडून खंडन करण्यात आलं असून मी पक्षावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
