एक दिवस नर्सचे कपडे घालायचे ही नौटंकी मला नाही जमतं; संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यांच्यावर देशपांडे यांनी खोचक टीका करत उत्तर दिलं आहे
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. त्यानंतर ते व्हिलचेअरवर होते. त्यानंतर त्यांनी होळीचा आनंद लुटला. त्याचे व्हीडिओ ही चांगलेच व्हायरल झाले. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यांच्यावर देशपांडे यांनी खोचक टीका करत उत्तर दिलं आहे. यावेळी देशपांडे एका दिवसाची नर्स होणं म्हणजे नौटंकी, मानेला पट्टा बांधून सहानुभूती मिळवणं म्हणजे नौटंकी अशा टीका केली आहे. सहानुभूती मिळवणं हे यांना जमतं मी असली नौटंकी करत नाही. कर्तव्यशुन्य माणसाला सहानुभूतीची गरज असते असा टोला देशपांडे यांनी पेडणेकर यांना लगावला.
Latest Videos