सुषमाताई घसा कोरडा करत फिरतात, इकडे शिवसेना पैसे घेऊन मोकळी, संदीप देशपांडेंचा आरोप काय?

सुषमाताई घसा कोरडा करत फिरतात, इकडे शिवसेना पैसे घेऊन मोकळी, संदीप देशपांडेंचा आरोप काय?

| Updated on: Nov 03, 2022 | 2:10 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारतर्फे राज्यातील 75 हजार तरुणांना रोजगार देण्यासंबंधीची जाहिरात आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली आहे

दिनेश दुखंडे, मुंबईः एकिकडे शिंदे सरकारवर (Eknath Shinde Government) आरोप करत सुषमाताई अंधारे घसा कोरडा करतात. तर दुसरीकडे शिवसेना सरकारकडून पैसे घेऊन ‘सामना’तून जाहिरात प्रकाशित करतात. शिवसेनेचा (Shivsena) देव पैशात आहे, हे आता कळलंय, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे सांगत फिरतात हे खोके सरकार आहे. म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजेत, पण सरकार नको? ही कुठली दुटप्पी भूमिका? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारतर्फे राज्यातील 75 हजार तरुणांना रोजगार देण्यासंबंधीची जाहिरात आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Published on: Nov 03, 2022 12:24 PM