'कोण दिपाली सय्यद, कोणत्या पक्षात?' मनसे नेत्याचा थेट सवाल?

‘कोण दिपाली सय्यद, कोणत्या पक्षात?’ मनसे नेत्याचा थेट सवाल?

| Updated on: Aug 20, 2023 | 1:47 PM

राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरून महाराष्ट्र मननिर्माण सेना राज्यभरात आक्रमक झाली आहे. तर खड्ड्यांबाबत मनसे आता रस्त्यावर उतरणार असून आंदोलन करणार आहे. यावरून अभिनेत्री आणि शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं होतं

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राज्यभरातील रस्ते हे खड्ड्यांनी भरलेले आहेत. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. तर सरकारकडून यावर योग्य उपाय केला जात नाही. तर काही रस्त्यांचे काम हे वर्षांनुवर्षे सुरू आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र मननिर्माण सेनेकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सरकारला अल्टीमेट देत आपले दौरे सुरू केले आहे. यावरून शिंदे गटाच्या नेत्या तथा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते, तेवढे रस्त्यावर खड्डे…असे म्हटलं होतं. त्यावरून मनसे नेत्यानं यावरून पलटवार केला होता. तर आज देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार करताना कोण दिपाली सय्यद? कोण विचारतय तिला? दिपाली सय्यद कुठल्या पक्षाच्या ते तर पहिले सांगा. कोणाला आपण महत्व द्यायचं याचा पण विचार केला पाहिजे ना असं म्हटलं आहे.

Published on: Aug 20, 2023 01:47 PM