Special Report | पुरावे द्या राजकारण सोडतो : संदीप देशपांडे-TV9
संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना पोलिसांनी ज्या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता...तिथंच हे दोघेही 19 दिवसांनी आलेत...अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर देशपांडे आणि धुरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली..आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत देशपांडे सरकारवर गंभीर आरोप केला.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना पोलिसांनी ज्या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता…तिथंच हे दोघेही 19 दिवसांनी आलेत…अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर देशपांडे आणि धुरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली..आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत देशपांडे सरकारवर गंभीर आरोप केला…14 दिवस तडीपार किंवा जेलमध्ये टाकणार होते, त्यामुळं आम्ही निघून गेलो असं देशपांडे म्हणतायत.. संदीप देशपांडे आणि धुरींसह 4 जणांवर मनुष्यवधाचा प्रयत्न करण्यासारखा गंभीर गुन्हा दाखल झालाय…तसंच महिला पोलीस पडल्यानंतरही देशपांडे आणि धुरी सुसाट का निघाले, यावरुनही शिवसेनेनं घेरलं होतं.
मात्र महिला पोलिसांना आमचा धक्का लागलाच नाही, त्याचे पुरावे दाखवल्यास राजकारण सोडणार असं देशपांडेंनी म्हटलंय…
4 मे पासून देशपांडे आणि धुरी गायब होते…ते पोलिसांच्या हातीही लागले नाही. मात्र मी फरार नव्हतो तर भूमिगत होते..आम्हाला फरार म्हणत असाल तर खासदार भावना गवळी कुठे आहेत असा सवालही देशपांडेंनी शिवसेनेला विचारलाय… 4 मे रोजी राज ठाकरेंच्या निवास स्थानाबाहेर जी घटना घडली. त्यानंतर गुन्हा दाखल झालेले आणखी एक मनसेचे पदाधिकारी म्हणजे संतोष साळी..संतोष साळींना तर न्यायालयीन कोठडीनंतर जेलमध्ये जावं लागलं…मात्र त्यांना खूनाचे आरोप असलेल्या गुन्हेगारांसोबत ठेवलं, असा आरोपही देशपांडेंनी केलाय. शिवसेना आणि मनसे सध्या आमनेसामने आलीय. राजकीय सुडबुद्धीतून कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचा आहे…तर सरकार कायदेशीर कारवाई असल्याचं म्हणतेय..