‘भाजपला मुजोर टोल कंत्राटदारांची दलाली करायचीय का?’ मनसे नेत्याचा खरमरीत सवाल
रविवारी पहाटे टोलनाक्याची तोडफोड केली होती. त्यावरून तोडफोड करणं राजकारण्यांना शोभत नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अमित ठाकरे यांच्यावर केली होती. तर भाजपकडून देखील यावरून टीका करण्यात आली होती.
मुंबई, 25 जुलै 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या अपमानावरून मोठा वाद सुरू झाला आहे. ते समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना सिन्नर टोलनाक्यावर त्यांचा अपमान करण्यात आला होता. त्यावरून मनसेकडून खळखट्याक करण्यात आला तसेच रविवारी पहाटे टोलनाक्याची तोडफोड केली होती. त्यावरून तोडफोड करणं राजकारण्यांना शोभत नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अमित ठाकरे यांच्यावर केली होती. तर भाजपकडून देखील यावरून टीका करण्यात आली होती. तर अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा असा टोला भाजपकडून ट्विट करत लगावण्यात आला होता. त्यावरून आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या #भाजप महाराष्ट्रातील मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का? असा सवाल केला आहे. तर यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.