‘मणिपूर विषय डायव्हर्ट करण्यासाठी लोकसभेत भाजपचा गलिच्छ आरोप’, मनसे आमदाराचा हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2023 | 6:56 PM

VIDEO | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस आरोपांवर मनसेच्या आमदाराची टीका

१० ऑगस्ट २०२३ | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेच्या आवारात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केला आहे. हा स्त्रियांचा अपमान असून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्मृती ईराणी यांनी केली आहे. या आरोपामुळे राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस आरोपांवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. ‘राहुल गांधी यांचं भाषण मीही पाहत होतो. त्यांनी जे भाषण संपल्यावर जे हातवारे केले, ते मला वाटत नाही की फ्लाईंग किस होतं. मणिपूर येथे महिलांवर अत्याचार झाला त्याबद्दल विषय सुरू होता. भाजपच्याच एक महिला खासदार त्यांनी हा विषय डायव्हर्ट होण्यासाठी केलेला गलिच्छ आरोप आहे’, असं माझं वैयक्तिक मत असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 10, 2023 06:52 PM
जगातील सर्वात खोल विहीर! पठ्ठ्यानं एक एकरात 60 फूट खोल, दोनशे फूट रुंद बांधली विहीर
‘मला बच्चू कडू यांच्या जागी आमदारकी द्या’, कुणी केली थेट मागणी?