मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक... सदस्य नोंदणीसाठी मनसेचे नवीन घोषवाक्य

मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक… सदस्य नोंदणीसाठी मनसेचे नवीन घोषवाक्य

| Updated on: Aug 24, 2022 | 11:26 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत . मात्र या दरम्यान मी हिंदवी रक्षक आणि मी महाराष्ट्र सेवा असे हे घोषवाक्य असणार आहे.  प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी  हे घोष वाक्य वापरले जाणार आहे.

मुंबई : मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक… सदस्य नोंदणीसाठी मनसेचे हे नवीन घोषवाक्य समोर आलय. उद्यापासून मनसेचे(MNS) राज्यभरात सदस्य नोंदणी मोहिम सुरु होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत . मात्र या दरम्यान मी हिंदवी रक्षक आणि मी महाराष्ट्र सेवा असे हे घोषवाक्य असणार आहे.  प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी  हे घोष वाक्य वापरले जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर आज प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी राज ठाकरे राज्यभर सभा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी देखील मनसेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

 

Published on: Aug 24, 2022 11:26 PM