ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती; मेळाव्यातील टीकेवर राऊत यांच्याकडून खरपूस समाचार
शिवसेनेवर ही परिस्थिती उद्धव ठाकरेंमुळेच आली असे म्हटलं होतं. त्या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर बुधवारी गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला होता. तसेच शिवसेनेवर ही परिस्थिती उद्धव ठाकरेंमुळेच आली असे म्हटलं होतं. त्या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाचं वय आता 18 आहे. त्यांच्या पक्ष आता वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचं काय सुरू आहे, मला माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या पक्षाचा विचार करतो. पण 18 वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. एकनाथ शिंदे, नारायण राणे, भाजप ही उद्धव ठाकरेंवरच बोलतात. याचा अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे असे राऊत म्हणाले.
Published on: Mar 23, 2023 11:28 AM
Latest Videos