मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांना कोरोनाची लागण, शिवतीर्थ निवास्थानाबाहेरुन थेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याच्याआधीही कोरोनाची लागण झाली होती. तर त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे 22 ऑक्टोबर 2021 रोजी निदर्शनास आले होते. त्यांना त्यावेळी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांच्यावर उद्या लिलावती रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया होणार होती. ती शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. राज्यतही कोरोनाचे रुग्ण काही ठिकाणी पुन्हा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनही पुन्हा अलर्ट मोडवर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याच्याआधीही कोरोनाची लागण झाली होती. तर त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे 22 ऑक्टोबर 2021 रोजी निदर्शनास आले होते. त्यांना त्यावेळी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Published on: May 31, 2022 11:37 PM
Latest Videos