… मात्र शरद पवार यांच्यावर लक्ष ठेवा, राज ठाकरे यांचा इंडिया आघाडीला खोचक सल्ला काय?

| Updated on: Dec 18, 2023 | 3:36 PM

इंडिया आघाडीवरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : इंडिआ आघाडीचा पॅसेज आता पूर्ण झाला आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर इंडिया आघाडीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी इंडिया आघाडीला उपरोधिक सल्लाही दिल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही एकत्र रहा पण शरद पवार यांच्यावर लक्ष ठेवा, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. यावेळी इंडिया आघाडीवरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प, मुंबई महापालिकेची निवडणूक या विषयावरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्च्यावर बोलताना राज ठाकरे यांनी खोचक वक्तव्य करत सेटेलमेंट नीट होत नाही म्हणून हा मोर्चा काढल्याचे म्हटले आहे.

Published on: Dec 18, 2023 03:35 PM
मग आज का मोर्चा काढला? धारावीसाठी काढलेल्या मोर्चावरून राज ठाकरे यांचा ठाकरेंना खोचक सवाल
सलीम कुत्ताची हत्या 25 वर्षापूर्वीच; काँग्रेस आमदाराचा नवा दावा अन् पुन्हा राजकारणात खळबळ