Special Report | Raj Thackeray यांच्या निशाण्यावर आता कोण?

| Updated on: Apr 30, 2022 | 9:38 PM

सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची सभा निर्णायक होणार असून, राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी उद्याच्या औरंगाबादच्या सभेत वाढत्या महागाईवर प्रहार करावा, असा सल्ला एखनाथ खडसे यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी आज राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले असून तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे. सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची सभा निर्णायक होणार असून, राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी उद्याच्या औरंगाबादच्या सभेत वाढत्या महागाईवर प्रहार करावा, असा सल्ला एखनाथ खडसे यांनी दिला आहे. टीकाटिप्पणी तर कराचं पण वाढत्या महागाईवर पण बोला. राज ठाकरे ना विरोधी पक्षात आहेत ना सत्तेत. ना महाराष्ट्रात आहे ना केंद्रात आहेत. त्यांनी टीका टिप्पणी करण्यापेक्षा महागाईवर मत मांडावे, असेही खडसे म्हणाले.