मनसे अध्यक्ष Raj Thackeray अॅक्शन मोडवर, मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

मनसे अध्यक्ष Raj Thackeray अॅक्शन मोडवर, मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

| Updated on: Jul 21, 2022 | 11:13 AM

राज्यातलं राजकारण एका वेगळ्या वळणावर पोहोचल्याने पालिकेवरती आपला झेंडा फडकावण्यासाठी अनेक पक्ष सज्ज झाले आहेत. मागच्या पाच वर्षापासून पालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे.

राज्यातलं राजकारण एका वेगळ्या वळणावर पोहोचल्याने पालिकेवरती आपला झेंडा फडकावण्यासाठी अनेक पक्ष सज्ज झाले आहेत. मागच्या पाच वर्षापासून पालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना पालिका शिवसेनेकडे राहिलं असं वाटतं होतं. पण महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्याने पालिका कोणाकडे जाणार हे पाहावं लागेल. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. ती बैठक पालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने होती. अनेक इच्छूकांच्या राज ठाकरेंनी भेटी घेतल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे मागच्या काही दिवसांपासून अधिक सक्रीय झाले आहेत. त्यामुळे होणारी पालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची होईल असं वाटतंय.

Published on: Jul 21, 2022 11:00 AM