Special Report | मोदी सरकार राज ठाकरेंना सुरक्षा देणार?

| Updated on: May 11, 2022 | 9:24 PM

राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागला तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पेटेल. आम्ही वारंवार राज्य सरकार आणि केंद्राकडे राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षा मागत आहोत. मात्र दुर्लक्ष करीत आहेत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मला आणि राज साहेबांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अजानच्या विषयावरून धमकीचे पत्र आले आहे हिंदीत पत्र आहे. गृहमंत्री यांनी सांगितलं पोलीस कमिशनर सोबत बोलतो ते बोलतील. बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जर धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल राज्य सरकार दखल घेत नाही केंद्राने दखल घ्यावी. मला माझ्या कार्यालयात धमकीच पत्र आलंय. त्यात मला जीवे मारण्याची धमकी दिली. सोबत राज ठाकरे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काल ते राज ठाकरे यांना दाखवलं. ते पत्र CP ला दिलं आहे. ते तपास करतील. पत्र कोणाकडून आलं यांचा मला माहिती नाही. राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागला तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पेटेल. आम्ही वारंवार राज्य सरकार आणि केंद्राकडे राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षा मागत आहोत. मात्र दुर्लक्ष करीत आहेत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

Published on: May 11, 2022 09:24 PM