MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक
Slum Redevelopment Authority Issue : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे.
मुंबईच्या बांद्रा येथे असलेल्या एसआरए कार्यालयाबाहेर वरळीच्या सिद्धार्थनगरचे रहिवासी आणि मनसे कार्यकर्ते पोहोचले असुन प्रशासनाविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. प्रेमनगर इथला विकास रखडलेला आहे. गेल्या 27 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प हा आजतागायत का पूर्ण झालेला नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी जमा झालेले बघायला मिळत आहेत. सध्या या आंदोलकांना कार्यालयापासून 100 मीटर लांबच पोलिसांकडून रोखण्यात आलेलं आहे.
Published on: Apr 03, 2025 04:05 PM
Latest Videos

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा

लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही? भुजबळांनी सांगितलं...

धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक

तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
