MNS Sandeep Deshpande : मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नियुक्तीची घोषणा होताच संदीप देशपांडेंनी असं काही केलं की..
Raj Thackeray Announce Mumbai City President : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पहिल्याच मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवली असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आता संदीप देशपांडे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पक्ष संघटनेत बदल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून काही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय देखील त्यांनी घेतले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या एका बैठकीत हे निर्णय झाले आहेत. यात मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर इतरही काही महत्वाच्या पदांच्या नेमणूका झाल्या आहेत. पहिल्याच मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी ही संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ज्यावेळी बैठकीत करण्यात आली तेव्हाचा एक व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात मंचावर उपस्थित राहून राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा करताच मंचावर बसलेले संदीप देशपांडे हे लागलीच उठून राज ठाकरे यांच्या पाया पडले आहे. यानंतर उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.

अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी

'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका

मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व

माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
