राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली मोठी मागणी; म्हणाले, ‘… अशी माझी इच्छा’

| Updated on: Oct 10, 2024 | 4:36 PM

'टाटांच्या निधनानंतर सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे', असं राज ठाकरे पत्राद्वारे मोदींना म्हणाले.

Follow us on

रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीत मोठी मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी मोदींना पत्राद्वारे केली आहे. “ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.