Raj Thackeray : ‘मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण…’, राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश, पत्र व्हायरल

Raj Thackeray : ‘मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण…’, राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश, पत्र व्हायरल

| Updated on: Apr 05, 2025 | 2:57 PM

' काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का?', असा सवाल राज ठाकरेंनी केला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना नवा आदेश दिला आहे. यामध्ये मराठीचा आग्रह धरलात उत्तम झालं. सर्वदूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकद पण दिसली, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. दरम्यान, राज ठाकरे यांनी बँकांसह काही अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. त्यासाठी निवेदन देऊन अल्टिमेटम द्या, असा आदेश मनसैनिकांना दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी बँकेत धाड टाकत बँक मॅनेजरला निवेदन दिल्याचे पाहायला मिळाले होते. तर या निवेदनानंतर कित्येक ठिकाणी बँकांमधील हिंदी आणि इंग्रजीचे बोर्ड काढून मराठीत करण्यात आहे. तसेच अनेक बँकामध्ये मराठी भाषेचा वापरही सुरू झाला. त्यामुळे राज ठाकरे यांनी एक मनसैनिकांच्या नावाने एक पत्र लिहित आंदोलनाबाबत नवा आदेश दिला आहे. ‘महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.. महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका’, असे पत्रात म्हटले आहे.

Published on: Apr 05, 2025 02:40 PM