राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेचा मिनी टिझर दाखवला; म्हणाले, पिक्चर अभी बाकी है!
पनवेलमध्ये मनसेच्या वतीने मराठी राजभाषा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात आज मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा...
पनवेल : पनवेलमध्ये मनसेच्या वतीने मराठी राजभाषा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात आज मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मराठी भाषेसोबतच राजकारणाशी संबंधितही प्रश्न विचारण्यात आले. सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, “या सगळ्यावर मी आज नाही तर गुढीपाडव्याच्या सभेला बोलणार आहे.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक प्रश्न निर्माण होतात. या सगळ्यावर मी गुढीपाडव्याच्या सभेतच बोलणार आहे”, असं राज ठाकरे म्हणालेत. त्यामुळे 22 मार्चची राज ठाकरे यांच्या सभेत महाराष्ट्रातील राजकारणातील अनेक मुद्दे असतील हे निश्चित…
Published on: Feb 27, 2023 12:55 PM
Latest Videos