Deepfake Videos : राज ठाकरे यांची मुलगीही ट्रोल? शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझ्या मुलीलाही…
डीपफेक व्हिडीओ आणि कमेंट्सवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या मुलीला सुद्धा वाटेल तसे मेसेज सोशल मीडियावर येत असतात. शर्मिला ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मुंबई, १० डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नावाने एक व्हिडीओ व्हायरल होत होता. नंतर रश्मिकाही डीपफेकच्या जाळ्यात अडकल्याचे तिने स्वतः सांगितले होते. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलीलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. डीपफेक व्हिडीओ आणि कमेंट्सवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या मुलीला सुद्धा वाटेल तसे मेसेज सोशल मीडियावर येत असतात. शर्मिला ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डीपफेक व्हिडीओ आणि सोशल मीडियावरून येणाऱ्या कमेंट्सवर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ही माहिती दिली. तसेच देशातील ब्रिटिशकालीन कायदे तकलादू असून हे कायदे बदलले पाहिजे, अशी मागणीही शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
Published on: Dec 10, 2023 02:44 PM