अनधिकृत बांधकामं प्रशासनाला दाखवणार, कारवाईला भाग पाडणार; मनसे आक्रमक
Sandeep Deshpande : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली त्यावरही मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा काँग्रेस आणि भाजपचा अंतर्गत विषय आहे, असं संदीप देशपांडे म्हणालेत. पाहा...
मुंबई : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काही ठिकाणी कारवाईही झाली. त्यानंतर मनसेचे नेतेही आक्रमक झाले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंब्रा असू द्या किंवा अन्य कुठेही असू द्या. महाराष्ट्र सैनिक हे संपूर्णपणे जागृत होऊन जिथे जिथे अशा प्रकारचा अनधिकृत बांधकाम आहेत, तिथे पाठपुरवठा करून आम्ही ही कारवाई करायला भाग पाडणार, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. माहिममध्ये कारवाई झाली आहे. त्यासाठी निश्चितपणे अभिनंदन.राजसाहेबांनी देखील अभिनंदन केलं आहे, असं देशपांडे म्हणाले.
Published on: Mar 25, 2023 08:14 AM
Latest Videos