Ashish Shelar | मनसेचं मत भाजपला, राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची माहिती
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने मोठी चुसर पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी पहायला मिळत असून राज्याचे राजकारण सध्या तापलेले आहे. तर आपले आमदार फुटू नयेत म्हणून भापज आणि महाविकास आघाडी सरकार मधील मित्र पक्षांनी कंबर कसली आहे. राज्याच्या वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सी खेच होताना दिसत आहे. तर आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना रेडकार्पेट घातलं जात आहे. तर एक एक आमदाराच मत हे आपल्याला मिळावं म्हणून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार असल्याने त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी रणनिती आखली जात आहे. तर त्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील (Raju Patil) यांचं मत कुणाला पडणार असा प्रश्न सर्वसामान्यांसह राजकीय पक्षांना पडला आहे. त्यातच आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांचे मत हे भाजपलाच असेल असा दावा केला आहे. त्यावरून आता वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.