मोठी बातमी! ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊत यांना भेटले अभिजीत पानसे

मोठी बातमी! ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊत यांना भेटले अभिजीत पानसे

| Updated on: Jul 06, 2023 | 2:05 PM

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ठाकरे गट आणि मनसैनिकांनी या दोन्ही नेत्यांना आवाहन करत बॅनरबाजीही केली. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा बंड केला आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ठाकरे गट आणि मनसैनिकांनी या दोन्ही नेत्यांना आवाहन करत बॅनरबाजीही केली. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे.मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे.

Published on: Jul 06, 2023 02:05 PM