देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर, कारण गुलदस्त्यात असलं तरी…

| Updated on: May 30, 2023 | 8:24 AM

VIDEO | देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थवर जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा, 'या' मुद्यावर झाली बैठक?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी काल रात्री साडे १० च्या सुमारास त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. रात्री उशिरा झालेल्या भेटीमागे काहीतर नक्की महत्त्वाचं कारणं असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षबांधनीच्या कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या दोघांमध्ये झालेल्या तासभर बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची आगामी काळात निवडणूक असणार आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटासाठी सर्वात जास्त प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या हातून सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी केला आहे. त्यासाठी पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भाजपसोबत युती होईल, अशी चर्चा होती. पण मध्यंतरी राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केलेली. त्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र या भेटीनं पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Published on: May 30, 2023 08:24 AM
Balu Dhanorkar : धानोरकर यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
‘खांद्यावर हात ठेवायचा अन् त्याचाच खेळ खल्लास…’, सामनातून पुन्हा भाजपवर हल्लाबोल