Sandeep Deshpande यांच्या निषेधार्थ नागपुरात मनसे कार्यकर्त्यांचं काळ्या पट्ट्या बांधत मूक आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेध नागपुरात मनसे कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधत मूक आंदोलन केल
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात चार जणांकडून मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. संदीप देशपांडे यांच्यावर त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर मनसे आक्रमक झाली होती. तर या हल्याप्रकरणी थेट ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या हल्याप्रकरणी पोलिसांनी भांडूपमधून कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर नागपुरात मनसे कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधत मूक आंदोलन करत या हल्याचा निषेध केला आहे.
Published on: Mar 06, 2023 06:28 PM
Latest Videos