Modi 3.0 Govt : नव्या सरकारमध्ये भाजपला गमवावी लागणार ‘ही’ मोठी गोष्टी, NDA मध्ये कसा असणार मंत्रिपदाचा फॉर्म्युला?

| Updated on: Jun 06, 2024 | 1:49 PM

नवीन सरकार भाजपाप्रणीत एनडीएचच येणार आहे. काल एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची निवड झाली. असे असले तरी भाजपाला पूर्वीसारखी एकाधिकारशाही चालवता येणार नाही. कारण भाजपकडे स्वबळावरील बहुमत नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

Follow us on

नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी मोदींकडे सोपवली आहे. नवीन सरकार भाजपाप्रणीत एनडीएचच येणार आहे. काल एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची निवड झाली. असे असले तरी भाजपाला पूर्वीसारखी एकाधिकारशाही चालवता येणार नाही. कारण भाजपकडे स्वबळावरील बहुमत नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपद गमवावी लागणार अशी माहिती आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्री पद दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे. नितीश कुमार यांच्या 12 जागांसाठी 2 कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या 16 जागांसाठी 3 कॅबिनेट मंत्री पद दिली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे.