‘सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत आम्ही घेतली नाही’; राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही सहभागी झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना काँग्रेसवर टीका केली.
नवी दिल्ली, 19 जुलै 2023 | देशात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. एकीकडे बेंगळुरूमध्ये २६ विरोधी पक्षांची दोन दिवसीय बैठक सुरू अशतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून आज दिल्लीत एनडीएच्या ३८ घटक पक्षांची बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही सहभागी झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना काँग्रेसवर टीका केली. तर सरकार बनवणे आणि सत्ता सत्ता मिळवणे हे ‘एनडीए’चे लक्ष नसून कोणाच्याही विरोधात अथवा सत्तेवरून हटवण्यासाठी ‘एनडीए’ची स्थापना झाली नाही. ‘एनडीए’ची स्थापना देशात स्थिरता आणण्यासाठी झाल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आता भारताबद्दल जगात विश्वास वाढलेला आहे. तर भाजप विरोधी पक्षात असताना देखील सकारात्मक राजकारण करत होता. हे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असताना देखील दाखवून दिलं आहे. सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत आम्ही घेतली नाही, अशी घणाघाती टीका मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.