Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत केली ‘इतकी’ घट

| Updated on: Aug 29, 2023 | 4:22 PM

VIDEO | सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केली मोठी कपात, सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार

Follow us on

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२३ | देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशातच मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला असून आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, आगामी काळात राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्याआधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.