या दिवसाचे औचित्य साधून पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळेस ही सजावट विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणीमाता, सोळखांबी, यांचा गाभारा तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु ,आष्टर , झेंडुची केशरी फुले , निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे ,पिवळा झेंडु ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे, या सजावटीमध्ये सावळा विठूरायाचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे .