अन् असा पिसारा फुलला….. पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचे नयनरम्य दृश्य
अजून पावसाळा दुर आहे. सध्या तापमानाचा पारा चढलेला आहे. मनुष्यांसह पशुपक्ष्यांचे देखील उन्हामुळे लाई-लाई होताना दिसत आहे. त्यातच भर उन्हाळ्यामध्ये मोराने पिसारा फुलवला आणि एकच आनंद पाहणाऱ्यांना झाला.
नाशिक : पावसाळा सुरू होताच सगळीकडे अनेक बदल झालेले दिसतात. निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला की काय असेच वाटते. तर पशू-पक्षी आनंदाने स्वच्छंद विहार करत बागडत असतात. एंकदरीत हर्ष उल्हास व आकर्षित करणारी दृश्ये ही आपल्याला दिसत असतात. मात्र अजून पावसाळा दुर आहे. सध्या तापमानाचा पारा चढलेला आहे. मनुष्यांसह पशुपक्ष्यांचे देखील उन्हामुळे लाई-लाई होताना दिसत आहे. त्यातच भर उन्हाळ्यामध्ये मोराने पिसारा फुलवला आणि एकच आनंद पाहणाऱ्यांना झाला. हे नयनरम्य दृश्य येवला तालुक्यातील रेंडाळे गावातील प्रवीण आहेर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुरू होतं. त्यांनी ते आपल्या दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे. भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या मोराने पिसारा पुलवल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे. वन्यप्राणी प्रेमी प्रवीण आहेर यांनी आपल्या शेतामध्ये वन्य प्राण्यांसह पक्षांकरिता पाण्याची सोय केली असून या ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या सुमारास पशुपक्षी पाणी पिण्यासाठी येथे येत असतात. याच वेळी आलेल्या काही मोरांपैकी एका मोराने पीसारा फुलला असून असे नयनरम्य झाले आहे.