नागरिकांची उकाड्यापासून सुटका, ‘या’ तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार
यावेळी मान्सून लवकर दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नैऋत्य मान्सून यावेळी 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचू शकतो. अशी माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे.
Monsoon Update 2024 : भारतीय हवामान खात्याने बुधवारी एक मोठी घोषणा केलीय. या वर्षी मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की, हे लवकर नाही. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 1 जून असल्याने ही सामान्य तारखेच्या जवळपास आहे. आयएमडी डेटानुसार, केरळमध्ये मान्सूनच्या सुरुवातीची तारीख गेल्या 150 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे, राज्यात मान्सूनची सर्वात पहिली सुरुवात 11 मे 1918 रोजी झाली होती.
Published on: May 16, 2024 12:28 PM
Latest Videos