ठाण्यात ढगाळ वातावरण… पावसाच्या हलक्या सरी कोसळणार; हवामान खात्याचा आणखी अंदाज काय?
आज येईल, उद्या येईल म्हणून सर्वच जण पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडक ऊन पसरले आहे. त्यामुळे सर्वांच्याच जीवाची काहिली झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनीच मान्सूनची चातकासारखी वाट पाहायला सुरुवात केली आहे. अशातच ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पुढील 24 तासात ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांना उकाड्यातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये येणार आहे. तर 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात सक्रिय होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. म्हणजेच मान्सून यंदा लवकर येण्याची शक्यता आहे. आधीच मुंबईत पाच टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. राज्यात पाणी तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. अशावेळी मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने सर्वच सुखावले आहेत.
Published on: May 27, 2024 12:46 PM
Latest Videos