Panchaganga River | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर

| Updated on: Jun 17, 2021 | 5:12 PM

कोल्हापूरात पावसाची मुसळधार सुरूच आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर गेलं आहे. Kolhapur Rain Update

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे.कोल्हापूरात पावसाची मुसळधार सुरूच आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर गेलं आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय.त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडलय.. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूक देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे… पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात सतरा फुटांनी वाढ झाल्याने नदीतील मंदिर आता पाण्याखाली गेलेत शिवाय आजूबाजूच्या शेतात देखील पाणी शिरायला सुरूवात झालीय.. नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Published on: Jun 17, 2021 05:06 PM