Uddhav Thackeray | भाजप राष्ट्रीय पक्ष की चोरबाजार? उद्धव ठाकरेंचा शिंदेंसह भाजपवर हल्लाबोल-TV9
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी करत भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजप पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार? असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला आहे.
सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगू लागली आहे. दरम्यान या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीला वादाचा रंग लागला. त्यावरून आता विरोधी पक्षासह आता सत्ताधाऱ्यांवर देखिल टीका होताना पहायला मिळत आहे. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षावर हल्ला केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सर्वकाही कमी पडत असल्याचे म्हटलं आहे. तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी करत भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजप पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार? असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला आहे.