GSB Ganpati | जीएसबी गणपती चरणी 66 किलोंहून अधिकचे सोने
GSB Ganpati | जीएसबी गणपती चरणी भाविकभक्तांनी तब्बल 66 किलो सोने अर्पण केले आहे.
GSB Ganpati | जीएसबी गणपती (GSB Ganpati) चरणी भाविकभक्तांनी तब्बल 66 किलो सोने (Gold) अर्पण केले आहे. मुंबईतील वडाळा येतील नवासाला पावणारा जीएसबी गणपतीवर भाविकांची (Devotee)नितांत श्रद्धा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. भाविकांना गणेशोत्सवाचे यंदा वेध लागले होते. जानेवारीनंतरच देशातील कोरोनाचे निर्बंध दूर व्हायला सुरुवात झाली होती. आता पुन्हा तोच जल्लोष आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपती उत्सवाला यंदा धडाक्यात सुरुवात झाली. त्यातच गणरायाला अभिषेक घालण्यासाठी वरुणराजानेही हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. वडाळा येथील जीएसबी मंडळाच्या गणपती पेंडॉलमध्ये होम हवनही सुरु आहे. तसेच भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंडळाने अनेक सेवा सुरु केल्या आहेत.
Published on: Aug 31, 2022 04:17 PM
Latest Videos