बी फार्म तरुणाने पुरविले खवय्यांचे चोचले, त्याने सुरु केला असा उद्योग की...

बी फार्म तरुणाने पुरविले खवय्यांचे चोचले, त्याने सुरु केला असा उद्योग की…

| Updated on: Feb 10, 2023 | 9:39 AM

वैभवने लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारा असा पाणीपुरीचा व्यवसाय सुरु केला. जवळपास १८ ते १९ प्रकारच्या पाणीपुरीची व्हरायटी त्याने आपल्या दुकानात ठेवल्या आहेत.

बुलढाणा : येथील एका तरुणाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु केला. पण, व्यवसायाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्याने एक वेगळीच शक्कल लढविली आहे. वैभव कुलकर्णी असे या तरुणाचे नाव असून तो बी फार्म झाला आहे. वैभवने लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारा असा पाणीपुरीचा व्यवसाय सुरु केला. जवळपास १८ ते १९ प्रकारच्या पाणीपुरीची व्हरायटी त्याने आपल्या दुकानात ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या ४० रुपयात अनलिमिटेड पाणीपुरी हा तरुण देत आहे. आज आपण बघितलं तर पाणीपुरीचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गाड्या लागलेल्या आहेत. पण, स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी नवीन संकल्पना आणली आहे. जोपर्यंत तुम्ही नाही म्हणणार तोपर्यंत चाळीस रुपयांमध्ये अनलिमिटेड पोटभर पाणीपुरी देतो आहे. ही पाणीपुरी खाण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे येतात, असे वैभव सांगतो.

Published on: Feb 10, 2023 09:39 AM