बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चलती, फुलं, लायटिंग, थर्माकोल सारं काही चायनीज

बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चलती, फुलं, लायटिंग, थर्माकोल सारं काही चायनीज

| Updated on: Aug 31, 2022 | 10:51 PM

काही ग्राहकांपर्यंत ताजी फुलंही पोहचत नाहीत. त्यामुळं काही ग्राहकांनी चायनीज फुलांना पसंती दर्शविली आहे. चायनीज फुलांची या माळा वर्षानुवर्षे वापरता येतात. त्यामुळं ग्राहकांचा त्याकडं ओढा जास्त आहे.

गणेश उत्सवाचा सण सगळीकडं पाहायला मिळतो. गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्यात. बाजारपेठेत चायनीज वस्तूंची रेलचेल पाहायला मिळते. झेंडूची फुलही चायनीज आलीत. फुलं, लायटिंग, थर्माकोल, सगळं काही चायनीज आलंय. ओरिजनल फुलं विकणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फटका बसतोय. गणेश उत्सवाच चायनीज वस्तूंची चलती आहे. पुण्यातील बाजारात झेंडूची फुलं बनावटी दिसतात. नैसर्गिक फुलांचा रंग या फुलांना देण्यात आलाय. यंदा झेंडूच्या फुलांचं उत्पन्न घटलंय. काही ग्राहकांपर्यंत ताजी फुलंही पोहचत नाहीत. त्यामुळं काही ग्राहकांनी चायनीज फुलांना पसंती दर्शविली आहे. चायनीज फुलांची या माळा वर्षानुवर्षे वापरता येतात. त्यामुळं ग्राहकांचा त्याकडं ओढा जास्त आहे.

Published on: Aug 31, 2022 10:51 PM