Special report : शिंदे गट आणि मनसे युतीसाठी हालचाली? नव्या युतीवरून ‘राज’ की बात!
नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील जवळीक महायुतीच्या दिशेनं पाहिली जातेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील जवळीक चांगलीच वाढली आहे. आधी शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आले. गणपती दर्शनाचं निमित्त असलं, तरी मनसे आणि शिंदे गट यांच्यात खलबत झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिंदे गट आणि मनसे अशी महायुती होणार का, अशी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे हे शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गेल्यानं या चर्चांना उधाण आलंय.गेल्या काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळीकता वाढली. त्यामुळं नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील जवळीक महायुतीच्या दिशेनं पाहिली जातेय.
Published on: Sep 06, 2022 09:12 PM
Latest Videos