राजीनामा शरद पवार यांच्याकडे सोपविणाऱ्या अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादीने सोपविली मोठी जबाबदारी!

राजीनामा शरद पवार यांच्याकडे सोपविणाऱ्या अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादीने सोपविली मोठी जबाबदारी!

| Updated on: Jul 12, 2023 | 8:51 AM

शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर पक्ष सोडून अजित पवार यांच्याबरोबर जाणाऱ्यामध्ये खासदार-आमदारांपासून शेवटचा घटक मानला जाणारा कार्यकर्ता देखील आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली. त्यांनी आपल्या बरोबर २५ च्या घरात आमदार नेलेत. त्यामुध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर पक्ष सोडून अजित पवार यांच्याबरोबर जाणाऱ्यामध्ये खासदार-आमदारांपासून शेवटचा घटक मानला जाणारा कार्यकर्ता देखील आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या लोकसभेला कसे तोंड द्यावे असा प्रश्न अता शरद पवार आणि त्यांची नेत्यांपुढे आहे. याचदरम्यान अजित पवार यांच्या शपथविधीला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावल्याने ते देखील अजित पवार गटात जातील अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण त्यांनी आपण शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे सांगत एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे दिला होता. ज्यानंतर राष्ट्रवादीत चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर अनेक प्रसंगात अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्याबरोबर उभे असलेले दिसले आहेत. याचदरम्यान आता अमोल कोल्हे यांना पक्षांने नवीन जबाबदारी दिली आहे. पुन्हा एकदा शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही नविन मोहीम ते कशी फत्ते करतात आता याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jul 12, 2023 08:51 AM