शरद पवार यांचा आदेश कोल्हे यांनी धुडकवला? घेतला कोणता मोठा निर्णय?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस यांचा हाथ धरला आहे. तर शरद पवार यांची साथ सोडली आहे. यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडालेली असून राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे. असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
पुणे : गेल्या दोन एक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस यांचा हाथ धरला आहे. तर शरद पवार यांची साथ सोडली आहे. यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडालेली असून राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे. असा अनेकांना प्रश्न पडला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी थेट आपण खासदराकीचा राजीनामा देणार असलयाचे जाहिर केल्याने अनेकांसह राष्ट्रवादीतील नेत्यांना धक्का बसला आहे. मात्र याच्या आधी शरद पवार यांनी त्यांना कामाला लागा म्हणत तेच शिरूरचे खासदार असतील असे म्हटलं होतं. मात्र आता कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून त्याच काय करावं ते त्यांनी ठरवावं असं म्हटलं आहे. याच्याआधी अजित पवार यांच्या शपथविधीला ते हजर होते. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना, मी साहेबांन सोबतच असं म्हटलं होतं. पण आजा त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे म्हटलं आहे. तर राज्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देत असून मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण असं करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.