Amol Kolhe On Ketaki Chitale | Sharad Pawar यांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध : खासदार अमोल कोल्हे
पवारांना टार्गेट करून जातीय विष कोण पेरतंय असा सवालही नेटकरी करत आहेत. या निमित्ताने तीन पोस्टही चर्चेत आल्या आहेत. शिवाय केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitle) हिने वकील नितीन भावे (nitin bhave) यांची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे. त्यावरून केतकीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच केतकीवर टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध असल्याचे म्हटले आहे.
Published on: May 14, 2022 05:25 PM
Latest Videos